Ad will apear here
Next
सोयाबीन कटलेट


मुलंही आवडीनं खातील अशी पौष्टिक सोयाबीनची एक खास रेसिपी, सोयाबीन कटलेट.
...................
मानवी शरीराला वनस्पतीजन्य इस्ट्रोजेनची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे आहारातील या घटकाचे प्रमाण वाढवले पाहिजे. सोयाबीनमध्ये हे इस्ट्रोजेन भरपूर प्रमाणात असते. शिवाय सोयाबीनमध्ये प्रथिनांचाही मुबलक साठा आहे. रोजच्या जेवणात त्याचा वापर केलाच पाहिजे. खरं तर आपण दररोज खाणाऱ्या गव्हाच्या पिठातही सोयाबीनचं पीठ एकत्र करून त्याचा वापर करू शकतो. पोळी करण्यासाठी गव्हाचं पीठ दळून आणताना काही ठराविक मात्रेत सोयाबीन एकत्र करून ते दळून आणले, तर वेगळे सोयाबीन खाण्याची गरज पडणार नाही. मुलांनाही लहान वयापासून आहारात सोयाबीन दिल्यास त्याचा शारीरिक वाढीसाठी उपयोग होतो. सोयाबीनची भाजी, पराठे असेही अनेक पदार्थ केले जातात, परंतु असे पदार्थ मुलांच्या गळी उतरवणं तसं अवघडच आणि त्यातही ते जर डब्यात दिले तर मग तो डबा तसाच परत आला म्हणून समजावा. म्हणूनच मुलंही आवडीनं खातील अशी या सोयाबीनची एक खास रेसिपी, सोयाबीन कटलेट.. 

साहित्य : 
सोयाबीनचे चंक, बटाटा, गाजर, कोबी, मटार, कोणत्याही भाज्या, हिरवी मिरची, आले लसूण वाटण, बारीक रवा, तेल.

कृती : 
- सर्वप्रथम सोयाबीनचे चंक पाण्यात भिजत घाला. त्यामुळे ते फुगतील.
- त्यानंतर ते भिजलेले चंक मिक्सरने बारीक करून घ्या.
- घेतलेल्या सर्व भाज्या बारीक किसून घ्या. 
- बारीक केलेले सोयाबीन चंक आणि खिसलेल्या भाज्या एकत्रित करून घ्या. 
- या मिश्रणात बारीक रवा, चवीपुरते मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे मिश्रण चांगले एकत्रित मळून घ्या. 
- त्याच्या टिक्क्या तयार करून घ्या. तव्यावर थोडेसे तेल घेऊन या टिक्क्या चांगल्या परतून घ्या. टिक्क्या तयार.
- हाच प्रकार आप्पेपात्रातही करता येईल. बदल म्हणून त्यात तीळ, खोबरं, ओवा, जिरे घालता येईल आणि चवीत बदल करता येईल. 

 - डॉ. वृंदा कार्येकर 
ई-मेल : kvvrunda@gmail.com

(लेखिका पुण्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि होलिस्टिक हेल्थ कन्सल्टंट आहेत)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZOACH
Similar Posts
मिक्स व्हेज पराठा दुधी भोपळा, गाजर, मुळा, बीट अशा भाज्या मुले सहसा खात नाहीत. खरे तर या फळभाज्यांपासून भरपूर प्रमाणात आरोग्यवर्धक घटक मिळतात. त्यामुळे यांच्या सरसकट भाज्या न करता वेगळ्या पद्धतीने या भाज्या मुलांच्या आहारात कशा आणता येतील हे पाहिले पाहिजे. यासाठीच आज ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात आपण पाहत आहोत, मिक्स व्हेज पराठा
भाज्यांचे रोल्स विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. परंतु पोळीसोबत भाजी मुलांच्या गळी उतरवणं एक अवघड काम आहे. अशा वेळी या भाज्या मुले खातील याप्रमाणे वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्याकडे आईचा कल असतो. अशाच एका विविध भाज्या असलेल्या पदार्थाची रेसिपी आपण या वेळी पाहणार आहोत.... तो पदार्थ म्हणजे भाज्यांचे रोल्स
स्टीम्ड पालक वडी भरपूर पौष्टिक घटक असलेल्या पालकाची भाजी मुले खात नाहीत. याचे पराठेही मुलांना फारसे आवडत नाहीत. म्हणून मग पालकाचा एक नवीन पदार्थ खास मुलांसाठी होऊ शकतो, जो ते आवडीने खातील. आज आपण पाहू या स्टीम्ड पालक वडीची रेसिपी
भाज्यांचा पौष्टिक खिमा आज पाहू या भाज्यांचा पौष्टिक खिमा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language